Sunday, February 21, 2016

'शिवजयंती'- महोत्सव भाग-१

विविध जागी पोस्ट झालेल्या शिवरायांवरील संदेशांचा एक संग्रह.... भाग एक

एक अशी साठवण, जे वाचल्यावर सतत आपल्या रक्तात ते भिनत जाईल आणि शरीरात स्फूर्ती संचारत जाईल.

०१. ना चिंता ना भिती
ज्याच्या मनामध्ये
राजे शिवछत्रपती

भगव्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरतोस कुणाला वेडया
तु तर शिवबाचा वाघ आहे

ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा शिवबाचे आम्ही भक्त...    सौजन्य:- व्हाट्सअप

२. -- शिव जयंती ------
.            कवी- भालचंद्र कोळपकर
चला आता आपणच थोडं थोडं
शिवाजी होऊया
छत्रपतींच्या ऐतिहासिक कार्याला
नवी दिशा देऊया

भाले ,तलवारी ,तोफांची आता
गरज पडणार नाही
ओझ घेऊन अवघड किल्लाही
खरंच चढणार नाही

छापा टाकायला आता सुरतही कुठं
परकी राहिलीय
आदिलशाही , मोगलशाही तशी कुठं
बेरकी उरलीय

राजां सारखे संकटाशी सामने
रोज घडणार नाही
रात्रंदिन जिवावर बेतनारे संघर्षही
आज झडणार नाही

म्हणून इतकी अवघड लढाई
आपल्यासाठी नसेल
आणि जर आपल्या कार्याची निष्ठा
शिवचरणी असेल

तर मावळ्यांनी गावातच माणूसकिची
शपथ घ्यावी
जात-धर्म भेदाभेदाला आधी मुठमाती
संपूर्ण द्यावी

राजकीय पक्षांच्या रंगीत झेंड्यांना
गावाबाहेर काढावे
पाडा पाडी तोडफोडी नीच कावे
नदीत नेऊन सोडावे

किल्ला समजून प्रत्येक गावाला
सुरक्षित धरावं
विकास मोहिमांसाठी आपल्या नावाला
आरक्षित करावं

तिनशे वर्षानंतरही राजांचे किल्ले अजून
टिकलेले आहेत
आपली सरकारी बांधकामे मात्र का बरं
झुकलेले आहेत

याचा विचार करायला आपण कुठंतरी 
शिकलं पाहिजे
महाराजां सारखं रयतेचं मन कधीतरी
जिंकलं पाहिजे

मग राजेंना पुन्हा जन्म घेण्याची गरज
भासनार नाही
सुख संमृध्दी सदाचारा शिवाय येथे काही
असणार नाही

तरच राजेंची जयंती साजरी करण्यास
अर्थ येईल
आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'
सार्थ होईल
--- कवी _- भालचंद्र कोळपकर
(९९२२७६०१२५/९४०३५४८५७४ )
नान्नज ता. जामखेड जि. अ' नगर
   सौजन्य:- व्हाट्सअप

०३.
औरंगजेब म्हणजे
आशिया खंडातला सर्वात शक्तीशाली बादशाह
ज्याने तख्तासाठी आपल्या रक्ताच्या नात्यांवर उलटला
ज्यान आपल्या हयातीत
कुणाचा उंच स्वरात आवाज ऐकला नाही
तो औरंगजेब !
हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यावर
राज्य करण्याच स्वप्न बाळगुन होता
ज्याच्या धर्मांधतेच अन कौर्याच दर्शन
ईतिहासाच्या पानो पानी होत
राक्षसी संशयी वृत्तीचा हा बेलगाम
वारसदार होता
ज्याला आयुष्यात पराभव आणि अपमान
मान्य नव्हता !
पण
त्याच्याच साम्राज्यात जाऊन
त्याच्याच दरबारात
त्याच्याच समोर
त्याच्या नजरेला नजर भिडवुन
भर दरबारत अपमान करुन दहाडनारा
एकच मर्द होऊन गेला !
ज्यांच नाव होतं !
"महाराज शिवछत्रपती" #व्हाट्सअप

०४. बिदरशाहीची "शकले उडाली,

नाश पावली "आदिलशाही" ,

"मोगलायीच् या" तर चिंद्या उडल्या,

नायनाट झाली"निजामशाही ",

रोवोनी पाय ह्या जुलमीनच्या

छातीवरती,

आजही जगावर राज्य करते

आमच्या शिवरायांची"शिवशाही. #व्हाट्सअप

०५. स्वराज मिळवुन देण्यासाठी तो राञंदिवस झुरला...
जनतेच्या अंधारी दुनियेत
तो एकटाच सुर्य ठरला...
"अरे_गर्वाने_देतो_आम्ही_त्याला_देवाची_ जागा"

कारण एका मराठ्याचा मुलगा अवघ्या 33 कोटीँना पुरला....
🚩🚩||| जय शिवराय |||🚩🚩 #व्हाट्सअप

६. माजली असेल कुञी पण,
आम्हाला आङवी जात नाही.
कारण त्यांना चांगल्याने माहीती आहे,
वाघ फाङल्या शिवाय राहात नाही.
भुंकत आसली माघारी,
तरी आमच्या समोर भुंकत नाही.
त्यांना हे देखील माहीती आहे
हा वाघ त्यांच्यावर थुंकत सुध्दा नाही
कितीही पिसाळले असेल तारी
आपल्या गल्लीत फिरकत नाही
त्यांच्या बापाने सांगुन ठेवले आहे
मराठ्यांच्या वाटेवर जाऊ नका
गेले तर ते तुमच्या वाटेवय येऊन तुमची वाट लावल्या शिवाय हे मराठे त्यांच्या वाटेवर परतनार नाही

जगात सर्वांत भारी
" १९ फेब्रुवारी "
माझ्या देवाचा जन्मस्तोव
" शिवजयंती " च्या तुम्हा सर्व शिव भक्तांना मनापासुन शुभेच्छा. #व्हाट्सअप

०७. एक एक # # शिवभक्त_जोडला_जाईल ,
# # गर्दीचा
# # विक्रम_मोडला_जाईल .. # # शिवभक्त
# असल्याचा # # माज हा असलाच
# पाहिजे,# # कारण
# # महाराष्ट्रात_प्रत्येक_गावात
,# # प्रत्येक_घरात ...
# # शिवभक्त_दिसलाच_पाहिजे
# # आणि ,
# # भगवा_झेंडा हा # # फडकलाच_पाहीजे ..... #
🚩🚩🐅#शेर कभी #बीकते नहीं,
#कुत्तों के #बाजार में
और #बीकनेवाले दिखते नहीं
# शिवा # के #दरबार मैं....#$ #  🐅
🚩🚩जय_शिवराय 🚩🚩 #व्हाट्सअप

०८. 🚩📯🚩📯सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.....🚩📯🚩📯🚩📯🚩📯🚩

🚩🚩जय शिवराय🚩🚩 #व्हाट्सअप

०९. ‪‬आई म्हणते रस्त्यावरुन
मांजर आडवे गेले तर थांबत जा...
.
.
,
,
मी थांबतो,
,
.
.
,
,
,
कारण
.
.
.
.
मी अंधश्रद्धेला मानत नाही
मी आईला मानतो......
कोणी पत्नीला सोडुन
राम होत असेल...
कोणी आईला मारुन
परशु राम होत असेल...
कोणी स्ञी जातीवर डोळा ठेवुन
आसाराम होत असेल...
तर
ते राम हे नावघेण्यापेक्षा
शत्रूच्यापण बायका-मुलींना
आपल्या माय-बहीणीच्या नजरेनं बघणारे
राजे छञपती आम्हाला लाखो करोडो पटीने चांगले
.
.
कारण......
.
.
जिथं परस्त्रीचा आदर केला जात
नाही तिथे"रामायण" अन "महाभारत" घडतं..!
आणी जिथे परस्त्रीला माते समान
दर्जा दिला जातो तिथे "शिवराज्य" घडतं! !!! #व्हाट्सअप

१०. 🚩🚩 जगदंब 🚩🚩                             🚩   🚩जय शिवराय 🚩           🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩

🚩अब चीर दो सीना शैतानो का,
तलवार वही पुरानी है..!
रक्षक हो तुम इस भारत के,
ललकार रही भवानी है...🚩

  🚩दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!🚩

  🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩 #व्हाट्सअप

🙏🙏⛳⛳जय शिवराय 🙏🙏⛳⛳
#शिवजयंती

संकलन:- सागर बिसेन ( @sbisensagar )

Sunday, January 17, 2016

प्रवास पहिल्या 'अँड्रॉइडपर्यंतचा'

शिर्षकावरून असं काही वाटणार नाही तुम्हाला की यावरही काही लिहिण्यासारखं असतं म्हणून. होय खरंच! वाचताना यासंबंधी असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. असो तरीही मी लिहायचं म्हणून लिहितोय. तुम्हाला यावर काही सांगायच म्हणून सांगतोय. कदाचित उत्तरार्धाचा प्रवास तुम्हाला काही देऊन जाईल, सांगून जाईल.

आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या जगात माणसाला सर्व गोष्टींशी अवगत असणे खूप गरजेचे आहे. आणि मग हे सर्व जग जाणून घेताना आपल्याला काही साधनांची गरज असते. जग आज झपाट्याने बदलत आहे, सर्व काही सेकंदात बदलत आहे आणि संपूर्ण मानवजातीला या बदलांना आता आत्मसात करून घ्यायचं आहे. मग ह्या सर्व परिस्थितीशी जुडवून घेण्यासाठी आपणास काहीतरी सोबत हवे ना? जगाच्या बदलांसोबत आपण स्वतःला अवगत करण्यासाठी खूपशा उपकरणांचा उपयोग करत असतो. दिवसेंदिवस या उपकरणांत भर पडत आहे.

इंटरनेटच्या युगात मोबईल हे असेच एक उपकरण अथवा यंत्र आहे जे आपल्याला जगाशी जोडत असते. म्हणायला गेलं तर मोबाईल हेच प्राथमिक स्तरावरील तंत्रज्ञान म्हणून समाजात रुजलेले एक साधन आहे. आज वर्तमान युगात मोबाईलपण असंख्य प्रकारचे आले आहेत, आणि सारखे त्यांमध्ये बदल होत असतात. माणसाला त्यांच्या आवडीनिवडी नुसार जोडत असतात, जगणे सुकर करत असतात आणि इंटरनेटच्या सोबतीने जग जवळ आणून देतात.
आपली पिढी हि संगणक युगात, इंटरनेटच्या काळात व तंत्रज्ञानाच्या झोतात जगणारी पिढी आहे. इथे मोबाईल प्रत्येक दिवशी नवा रूप घेतो. मी इथे सांगत आहे अशाच माझ्या(ग्रामीण भागातील विचारांतून) मोबाइलची एक कथा.

शाळेतील शिक्षण पूर्ण होतपर्यंत तरी मोबाईल आमच्या हातात नव्हताच आणि ते माझ्यामते एकप्रकारे चांगलेच होते. आम्ही जेव्हा अकरावी किंवा बारावीला होतो (आमच्या कानी त्यावेळी हे माहित झालं म्हणून) तेव्हा काय ते देशात 'अँड्रॉइड' या प्रकारच्या मोबाईलचे पदार्पण झाले होते. त्याआधी मोबाईल काय, तर फक्त दोनच प्रकारचे मला माहित होते, ते म्हणजे एक 'साधा' आणि दुसरा गाण्यांवाला "मल्टिमिडीया". त्यावेळी मल्टिमिडीया ची छाप जास्त होती. फोटो आणि गाणे ऐकता येतात व थोडंफार नेट चालवता जमते म्हणून त्या मोबाईलचे कौतुक वाटायचे. माझंही असंच होतं. कॉलेजला सुरुवात केली ती नोकियाच्या मल्टिमिडीया सोबत. मुळात मल्टिमिडीया किंवा मागील दोनचार वर्षे डोकावून  बघितलं तर कळेल कि नोकिया म्हणजे मोबाईलची एक वेगळीच दुनिया. आमच्या गावात तरी प्रत्येकी दहा मधून सात लोकांकडे तेच सापडायचे आणि आताही सापडेलच कदाचित. 

हाच नोकिया माझ्याकडे पहिला मोबाईल म्हणून हाती आला. आता आपण कॉलेजला जाणार म्हणून  नवीनच मोबाईल घेतला पाहिजे असं काही नाही तर घरी वापरातच असलेला एक मी सोबत घेऊन आलो. हळूहळू त्या मोबईलशी जुळत गेलो, जुळवून घेतलं आणि कालांतराने तो मोबाईल मलाच कसा प्रिय वाटू लागला हे मलाच कळले नाही. ज्याप्रकारे आपल्या आवडत्या वस्तूला आपण जपून जपून ठेवत असतो त्याचप्रकारे मी त्या मोबाईलचं करायचो. बघायला गेलं तर तो दिसण्यात जुनाच होता. त्या मोबाईलचे कौतुक वाटून घेण्याचे कारण म्हणजे एकच कि ते मोबाइल नोकिया कंपनीचं पहिलं थ्री-जी मोबाईल. आधी हेही मला काही माहित नव्हते, कॉलेजला आल्यावर कळले कि आपला मोबाईल थ्री-जी आहे म्हणून. आता गावात कुठे बरोबर नेटवर्क? ते असंच चालत असते आपलं हळूहळू. जेव्हा शहरात शिकायला आलो तर मोबाईलवर टॉवर थ्री-जीचे  दाखवायचे.  तेव्हा कुठे माहित झालं कि आपला मोबाईल थ्रीजी आहे म्हणून. प्रत्यक्षात ते फक्त दिखावा म्हणून सांगायला थ्रीजी होते. आजपर्यंत मी कधी थ्रीजी रिचार्जही केला नाही. इथे बॅलन्स मारायला दहादा विचार करावा लागतो आणि ते तर अक्षरशः नेटचे होते. आतातर ते मोबईल अजूनच आपलेसे वाटू लागले होते. इतरांच्या तुलनेत तरी, मी त्यावरच सर्वकाही, मुख्यत्वेकरून करून मराठीत जलद लिहायला शिकलो, फेसबुक, ट्विटर वापरायला शिकलो. आता अजूनच त्या साध्याशा मोबाईलचे कौतुक वाटते होते.

बघा सांगता सांगता कुठे पोहचलो मी. असो. मग कॉलेजला गेल्यावर हळूहळू जाणवले कि लोकांकडे  स्क्रीनटच व मोठ्या सक्रीनवाले  मोबाईल येऊ लागले होते. आणि तेच होते 'अँड्रॉइड'. सर्व मुले एकमेकांना बघून तेच घेऊ  लागली होती, तंत्रज्ञानाच्या चर्चांचे पीक पिकू लागले, नवनवे ब्रँड मार्केटमध्ये आले. लोक फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर सोडून डायरेक्ट व्हाट्सअप, वीचाट, हाईक, स्काईप यावर उडी मारून बसले. हे सर्व बघताना छान वाटत होते मात्र त्यांची किंमत चार  ते पाच आकडी मध्ये डोलत आहे हे बघताना प्रश्नही मनी ओढत होते. तसं आजच्या युगात मोबाईल शिवाय जगणे म्हणजे मग आपल्याच जगात मर्यादित जगणे असे आहे. जर या युगात आपल्या जगाच्या पलीकडे डोकावून बघायचे असेल तर आज सर्वांना मोबाईलची गरज आहे आणि एका चांगल्या अँड्रॉइडची गरज आहे. हळूहळू आता सर्वांजवळ क्लासमध्ये अँड्रॉइड आले होते, त्यावरील खेळ रूढ झाले होते, सगळे वेगळेच  वाटत होते. यात मग नाही म्हंटल तरी माझ्यासारख्या एका ग्रामीण मुलाच्या मनात आपल्याकडेही असे काही असावे हि अधून मधून इच्छा जागृत होत होती व क्षणांतच विरतही होती.

शेवटी वाटायचे कि आपल्याकडे आहे तेच छान आहे. कारण यावर मराठीत फास्ट लिहिता येत होते, चांगल्याने नेट चालत होते, मग उगीच कशाला त्याची मागणी घालायची. असे माझ्यासारखे बाकी अजून खूप होते म्हणा, मात्र त्यांच्या तुलनेत माझा मोबाईल बरा होता.  नंतर
दोन -अडीच वर्षे झाली, आता मोबाईल जुना होत गेला होता, अँड्रॉइडची आकांक्षा मनात जन्म घेत होती, पण आपल्या जवळ मोबाईल असताना दुसऱ्याची मागणी करणे म्हणजे आम्हां सामान्य घरातल्या मुलांना थोडे अवघडच. सरळ मोबाईल हवा असा प्रश्न  मी घरच्यांना करू  शकत नव्हतो आणि त्यांना तर या गोष्टींबद्दल कणभरही माहित नव्हते, मग ते मला कसे बोलणार होते. इथे मी हे सांगण्याचं उद्देश्य हेच कि आयुष्यात काही गोष्टी शक्य असतात पण त्यासाठी विनाकारण मग बंदोबस्त करावा लागतो. समोरच्या माणसाला अशी मागणी हट्ट असल्यासारखी भासत असते.  मी मनात निर्धार केलं, आपण अँड्रॉईड तेव्हाच घेवू जेव्हा आपल्याकडे मोबाईल नसेल किंवा आपले घरचेच स्वताहून परवानगी देतील तेव्हा. तसं घरी आधीच बाकी 'मल्टिमिडीया' असताना नवीन घेणं म्हणजे काहीसं अडखळल्यागतच होत असते.म्हणून हे सगळे एका मोबाईलमागचे रामायण.  म्हणून मी तिथेच थांबलो होतो. शेवटी काहीतरी कल्पना नसलेलेच घडले.

गेल्या वर्षीची गोष्ट, अचानकच एके रात्री माझा मोबाईल चोरीला गेला आणि सोबत दोन मित्रांचे मोबाईपण. आता चोराला त्या मोबाईल मध्ये असे काय दिसले माहित नाही जो त्याने तो चोरून नेला. अड्रॉइडच्या युगात त्याने माझा मोबाईल का चोरला  हे त्याचे  तोच जाणे. शेवटी प्रयत्न केलेत पण तो काही मिळाला नाही. आता त्याचा विषयच मी सोडून दिला होता आणि आता त्या उपकरणावर असलेले माझे प्रेम आणि त्यामुळे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी या मनातून मला त्या मोबाईलची तरी सतत आठवण करून देतात.

घरी हे सर्व बोललो होतो. काही दिवस मोबाईल गेल्याचा शोक जाणवला. मग व्यवस्थित झाले. आता मला मोबाईल हवा होता. तसं काही महिने हे मी मोबाईलविणाच काढले . मात्र आता पूर्ण तयारी  झाली होती मी अँड्रॉइड घ्यायचं म्हणून मात्र तो कधी हे काही ठरलेले नव्हते. स्वतः बाबा  हजार बाराशे चा मोबाइलला कित्येक वर्षांपासून वापरत आहेत (व तो नवीनच अजूनही) आणि मी त्यांना हजाराच्या घरातल्या मोबाईलची मागणी कशी करावी हाच मोठा प्रश्न होता. मुळात आई बाबा नकार देतील असे होणार नव्हतेच आणि प्रत्येक आई बाबा  आपल्या मुलांच्या गरजांना पूर्ण  करतातच. मात्र त्या साठी माझ्याजवळ कारण हवे होते, घरी साधे मोबाईल असताना ते न वापरता नवीन अँड्रॉइड मोबाईलची मागणी का हे त्यांना समजवायचे होते जेणेकरून ते काही बोलणार नाहीत. तसं आमच्या सारख्या गावातल्या लोकांना मोबाईलचा असला काही नाद नसतोच, मात्र आता गरज म्हणून आणि आपल्याकडे असावं अँड्रॉइड म्हणून हि मागणी.

नवा मोबाईल घेण्यासाठी मी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला. बाबांनापण आता कळून चुकलं होतं कि मला नवा मोबाईल गरज म्हणून घेऊन द्यावा म्हणून, मात्र मीच परिस्थितीला पाहत बोलत नव्हतो. कारण एकसोबत एका मोबाईल मध्ये इतके पैसे गुंतवणे म्हणजे आमच्या सारख्या लोकांना थोडे अवघडच. मुळात घेणे सहज शक्य होते, एका दिवसात होणार होते मात्र त्यामागे होणारा खटाटोप आणि आर्थिक चिंता व मग कुठूनतरी मागणी ह्या गोष्टी जास्त समजून घेण्याच्या असतात. त्यामागे होणारा त्रास आणि विचारसरणी लक्षात घ्यावी लागते. आपल्याला हाताळायला म्हणून काही गोष्टी हव्या असतात पण त्या मिळवण्यासाठी ज्याचे कष्ट आणि श्रम असते ते खूप मोलाचे असते.

शेवटी दिवाळीचे दिवस आले. तसं सांगायला इथे मला नको पाहिजे पण सांगतो, दिवाळीला शहरात खरेदी, खर्च, झगमग असते, मात्र असली काही प्रथा गावात नसतेच. लोक  आपल्या आर्थिक पाठबळावर आनंदात दिवाळी साजरी करतात. पेपरात येणारी खरेदी, लोक म्हणतात तशी शॉपिंग आणि सिनेमात दाखवतात तसली दिवाळी नसते लोंकांची इथे. इथे दिवाळी नैसर्गिक असते, सहृदयतेची  असते. मात्र आमच्या सारखे काही बाहेरची हवा खातात आणि गावात फक्त दिखावा करतात. असो, शेवटी दिवाळीच्या निमित्ताने एकदाचं सर्वांना बोलून , तीनदा विचारून , बाबांच्या सहमतीने आणि आज्ञेने मी मोबाईल एकदाचा घेतला. आणि खास अविस्मरणीय म्हणजे तो माझ्या 'आईच्या वाढदिवसाला' घेतला.  तसं तर आम्ही लोक आपलाही वाढदिवस साजरा करत नसतो. आईचे वाढदिवस तर मग दूरच. आताच काहीएक वर्ष झालेत तर मित्र मिळून आम्ही आपला वाढदिवस साजरा करायला शिकलोत आणि ते फक्त मित्रांमुळे. मोबाईल घेतल्याचा आनंद मनात होता मात्र  आईच्या वाढदिवसाचे ते  निमित्त या आठवणीने तो क्षण अजूनच मनात कोरून बसलाय आता कायमचा. आणि हाच होता माझा "अँड्रॉइड घेण्यापूर्वीचा प्रवास." सरळ होता मात्र विचारांचा होता, बिकट होता पण छान होता.
माझे वर्तमान तंत्रज्ञानाला एकदा धन्यवाद कि हे सर्व मी त्यामुळेच लिहू शकलो आहे.

लेखन:-  सागर सा. बिसेन
              ९४०३८२४५६६