Saturday, April 14, 2018

'... आणि ते टिकून'च' रहावं'

खरंतर प्रत्येक गोष्ट संपवत जाण्यातही मजा नसतेच. नात्यांच्या आणि कुणाच्यातरी अस्तित्वाला नाकारण्याची भूमिका पत्करून काही चांगलं साध्य होत असेल असं मलातरी वाटत नाही. तसं, ही संज्ञाच नको वापरायला मुळी.नाकारण्यातून काही मिळवण्यापेक्षा आपण उलट लपवतच जातो खुपकाही.
प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो आणि तो निश्चित एक कालखंडात असतो. कितीही मोठे दूरदृष्टित्व आपल्याकडे असले तरी तो अंत आपल्याला माहिती नसतो. जेव्हा आपण त्याचा दारावर प्रत्यक्ष उभे असतो, त्याच्या काहीक्षण आधी आपल्याला ती घटिका कळत असते. मग, गोष्टींना त्यांच्या अंतकाळाच्या आधीच संपवून टाकण्याचा आणि काहीच नसल्यासारखा आव आणण्याचा अवाजवी खटाटोप आपण का करतो? नक्कीच! काही गोष्टींतून त्रासाची उत्पत्तीही होते आणि ते नियमस्त आहे. पण मग आपल्यात लढायची ताकद नाही का? आयुष्यात असणाऱ्या चांगल्या व्यक्तिमत्वाकडून अथवा नात्यांतून थोडंफार त्रासही होऊ शकतो आणि होतोही. पण याच्या तुलनेत आनंदाचे आणि समाधानचेच क्षण आपली पदरी जास्त पडले असतात. मग त्यांची नाही का आपल्याला तमा? असते! दुसरं, त्यातली गरज संपली असते का? असंही म्हणता येतं नाही.



खरंतर, गरज संपली नसते आणि त्यातून त्रासही झालेला नसतो. एकतर त्यातील गांभीर्याला समजून घेण्याची आपली ईच्छा नंतर उरलेली नसते किंवा आपल्या अंतरंगात 'विनाकारण' भीतीची एक लाट निर्माण झालेली असते. पण हेच नेमकं कारण असेल हेही निश्चित नाहीच. तरीही,  शेवटी आपल्याला हवं तसं कारण मिळालेलं नसतं.
"फक्त लोक बोलतात व आपण ऐकतो की सर्व संपवण्यात मजा आहे. विसरून जाण्यात मजा आहे. नक्कीच! पण चांगलं कशाला संपवायचं? अस्त वाईटांचाच हवा. आपली काही माणसे, काही नाती चांगलीच असतात कारण आपण त्यात जगतो. माझ्यामते काही गोष्टी संपलेल्या नसतातच, ते फक्त आपण तसे मानून असतो."
✍ ©
@sbisensagar
#मीनकळणारा

No comments:

Post a Comment